पश्‍चिम बंगालमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी वेगळे भोजन सभागृह

ममता बॅनर्जींच्या निर्णयाने पुन्हा नवीन वादाला तोंड फोडले

कोलकाता- कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अल्पसंख्याक बहुल सरकारी शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगळे भोजन सभागृह बनवावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यातच, भाजपने या निर्णयावरून तृणमूल कॉंग्रेस सरकारवर टीका केली आहे.

यासाठी सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये 70 टक्क्‌यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी असलेल्या शाळांची यादी राज्य सरकारने मागवली आहे. राज्य अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण विभागाकडून हे निर्देश देण्यात आले आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयावर भाजपाने विरोध दर्शवला असून शिक्षण घेणाऱ्या मुलांनाही धर्माचे धडे द्यायचे आहे का, धर्माच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव का करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये द्वेषभावना पसरवण्यामागे काय हेतू आहे. असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत. तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमधील एकमेकांवर केलेल्या आरोपाने पश्‍चिम बंगालचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत, त्यातच राज्य सरकारने हे आदेश दिल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.