कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापनाच्या विद्यार्थ्यांनी 15 दिवसीय गेलेल्या स्टडी टूर दरम्यान 4 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भारतीय सेनेला भेट दिली. सेना प्रमुख नरवणे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला आणि लष्कराबद्दल अधिक माहिती करून घेतली.
जनरल मनोज मुकुंद नरवणे पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी भारतीय लष्कराचे फोर स्टार जनरल आणि लष्करातील 28 वे प्रमुख आहेत. गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रा. विनय चाटी आणि प्रा. विनय कुलकर्णी यांनी घडवून आणलेल्या या सहलीमुळे विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली.
भारतीय सेनेचे अध्यक्ष, स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि लष्करप्रमुख (सीओएससी आणि सीओएएस) यांनी या संवादादरम्यान आणखीन भर टाकत म्हटले की “भारतीय सेना ही भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आणि त्यामुळे आपण विश्वास, नैतिकशास्त्र आणि मूल्यांचे समर्थन करणे आवश्यक आहे.”
आजचा तरूण वर्ग कोणत्याही गोष्टीची माहिती घेऊन चौकसपणे विचार करतो आणि अशा विद्यार्थ्यांच्या आकलनात भर पाडण्याचे काम करण्यासाठी गरवारे महाविद्यालय नेहमीच अशा स्टडी टूरचे आयोजन करण्यात सक्रीय असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता देशाच्या आर्थिक, भौगोलिक, प्राकृतिक माहितीचे आकलन होईल हे नक्की !!
– भारती उबाळे,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे