विद्यार्थ्यांनी सापडलेला मोबाईल केला परत

विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षकांकडून अनोखी भेट
जुन्नर: शाळा सुटल्यावर घरी जाताना नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी रस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल फोन जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याची घटना घडली आहे. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या नयन गाडेकर व ऋषीकेश पवार यांचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी खाऊ देऊन कौतुक केले. तसेच त्यांची शालेय फी भरणार असल्याचे ही जाहीर केले.

याप्रसंगी उपस्थित जुन्नर प्रेस क्लबच्या वतीने या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन शाबासकी देण्यात आली. सदर मोबाईलधारकास पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला. सध्या मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होत असताना या मुलांनी दाखविलेला प्रामाणिकपणा उल्लेखनीय असून शाळेच्या वतीने त्यांना गौरविण्यात येणार असल्याचे शाळेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.