विद्यार्थ्यांनी आनंदी राहून अभ्यास करावा ; विद्या बेंद्रे

विडणी:  मॅग मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटण या संस्थेच्यावतीने योग दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून योग दिन साजरा करण्यात आला.

लोणंद इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वही, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर असणारे किट, खाऊ वाटप मॅग मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेच्या चेअरमन सौ. विद्या बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम या शैक्षणिक वर्षातील शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे मुख्याध्यापिका सौ. संगीता कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाकरीता संस्थेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सूर्यकांत शिंदे, प्रदीप घाडगे, रणजित जांभुलकर, किशोर तनपुरे, किरण गिरी, मॅग फायनान्स लोणंदचे शाखाप्रमुख शशिकांत कुंभार, नजीर मुल्ला, बचत गटांच्या अध्यक्ष वैजंता काकडे युवा नेतृत्व निलयभाऊ बेंद्रे, नितीन अडसूळ हे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे शाळेकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना सौ. विद्या बेंद्रे म्हणाल्या, योग दिनानिमित्ताने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करताना खूप आनंद होत असून जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी आनंदी राहून अभ्यास करावा असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका सौ. मंगल गाढवे, सौ. उर्मिला जगताप, सौ. वनिता अडसूळ यांनाही मॅग संस्थेच्यावतीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मॅग सोसाटीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता. जि. प. शाळेच्या उपशिक्षिका सौ. वनिता अडसूळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.