‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाच्या यशानंतर आता, स्टुडंट ऑफ द इयर 2 हा सिक्वल येत आहे. स्टुडंट ऑफ द इयर 2 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या या चित्रपटात पहिल्यांदाच टायगर श्रॉफ,अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे कलाकार एकत्र झळकणार आहेत.

टायगर श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला. स्टुडंट ऑफ द इयर 2 हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाचा सिक्वल आहे. 3.5 मिनिटाच्या ट्रेलर मध्ये स्पर्धा, ऍक्शन आणि कॉलेज मधील मस्ती दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.