टायगर श्रॉफच्या “स्टुडंट ऑफ द इयर 2′ बे आपल्याला माणसात आणले आहे, अशी प्रतिक्रिया टायगर श्रॉफने दिली आहे. टायगर श्रॉफला बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळखले जायला लागले होते. या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी “स्टुडंट…’ फायद्याचा ठरला, असे तो म्हणतो. “बागी 2′ आणि “स्टुडंट ऑफ द इयर 2′ या दोन्ही सिनेमांमध्ये त्याचे नाव रोहन आहे आणि तो नेग्युलर कॉलेजला जाणारा विद्यार्थी म्हणूनच दिसतो आहे.
“स्टुडंट..’मध्ये अगदी सामान्य माणूस म्हणून आपल्याला सादर केले गेले आहे. जणू एखाद्याने आपल्यातील सगळी शक्तीच काढून घेतली असावी, असा मला भास होत होता. “स्टुडंट…’चा हिरो हा काही वन मॅन आर्मी नाही. देशासाठी लढणारा, कोणाला तरी वाचवणारा तो सुपरहिरो नाही. तो केवळ स्वतःला वाचवणारा असतो. असे टायगर म्हणाला. अगदी हॅपी गो लकी आणि मित्रांची खूप काळजी घेणारे हे कॅरेक्टर आहे, असेही त्याने सांगितले.
या “स्टुडंट…’च्या रोलमधून तो लवकरच बाहेरही पडणार आहे. लवकरच त्याच्या “बागी 3’च्या आणि हृतिक रोशनबरोबरच्या आणखी एका सिनेमाच्या कामाला सुरूवात होणार आहे. हे दोन्ही सिनेमे पुन्हा एकदा ऍक्शनपॅक्ड थ्रिलींग मुव्हीज असणार आहेत.