पुणे – राज्यातील महाविद्यालयीन निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच सुरू होणार असल्याचे चिन्हे आहेत. विद्यार्थी निवडणुकांवर मुंबईत बुधवारी (दि.17) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार विद्यापीठांना महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर करावे लागणार आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता महाविद्यालयांत पुन्हा 1193 नंतर विद्यार्थी निवडणुका खुल्या पद्धतीने होत आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यार्थी निवडणुकांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नित सर्व प्राचार्यांची बैठक बोलाविली होती. त्यात अनेक गोष्टींवर साधकबाधक चर्चा झाली. त्यामुळे प्राचार्यांमध्ये विद्यार्थी निवडणुकावरील ताण थोडा कमी झाल्याचे दिसून आले. या बैठकीत बहुतांश प्राचार्यांनी प्रत्यक्ष निवडणुका घेत असताना येणारे प्रश्न व अडचणी मांडल्या. ते सर्व प्रश्न आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत मांडले जाणार आहे.
मुंबईत होणाऱ्या बैठकीला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.