बसच्या अपघातात विद्यार्थीनीचा मृत्यू 

नगर-कल्याण बायपासजवळ अपघात : चार जखमी

नगर –  नगर- कल्याण महामार्गावरील बायपासजवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुचिता परमेश्‍वर बडे (वय-21. रा. सारसनगर, ता.नगर) हीचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत बाळू महादू शिंदे (वय-55,रा. खडकवाडी. पारनेर) यांनी कंटेनरचालका विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पारनेरहून नगरच्या दिशेने (एम.एच. 40, एन-8756) ही बस जात होती. बायपास ओलंडून बस जात असतानाच पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर बसला पाठीमागच्या बाजून धडक दिली.

या धडकेमुळे बस पलटी झाली. या अपघातामध्ये मृत्यू पावलेली तरुणी नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. पावणे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी तोफखाना पोलीस दाखल झाले आहेत. या भीषण अपघातामध्ये महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)