शिक्रापूर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडील घटना
शिक्रापूर प्रतिनिधी – शिक्रापूर ता. शिरूर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी शाळेमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीस वर्गातील शिक्षकाने मारहाण केली असल्याची घटना घडली असून सदर विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी शाळेमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सायंकाळच्या सुमारास रडत रडत घरी आली त्यावेळी सदर विद्यार्थिनीच्या आजोबांनी तिला रडण्याचे कारण विचारले असताना तिने मला शाळेतील एकनाथ खैरे गुरुजींनी मारले असल्याचे सांगितले, तेव्हा विद्यार्थिनीच्या आजोबांनी तिच्या पाठीवर पहिले असताना त्यांना तिच्या पाठीवर मारहाणीचे व्रण आढळून आले, त्यांनतर सदर विद्यार्थिनीच्या आजोबांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली, तर सदर विद्यार्थिनीच्या आजोबांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी शाळेतील शिक्षक एकनाथ खैरे यांच्यावर भा. द. वि. कलम 323 नुसार मारहाण केल्याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंद करत सदर शिक्षकांना नोटीस बजावत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर याबाबत बोलताना मुलीच्या पालकांची तक्रार आल्यानंतर सदर शिक्षकास पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
- अभ्यासाच्या कारणातून थोडे मारले – दत्तात्रय वारे ( मुख्याध्यापक )
शिक्रापूर ता. शिरूर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी या शाळेत दुसरीतील विद्यार्थिनीला मारहाण केल्याबाबत मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्याशी संपर्क साधला असताना सदर विद्यार्थिनीस अभ्यासाच्या कारणातून सदर शिक्षकाने थोडे मारले परंतु विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असल्याचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी सांगितले. - सदर प्रकार मला माहिती नसून पोलिसच कारवाई करतील – राजेसाहेब लोंढे ( शिक्षणाधिकारी )
शिक्रापूर ता. शिरूर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी या शाळेत दुसरीतील विद्यार्थिनीला मारहाण केल्याबाबत पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकाराबाबत मला अजून काही माहिती नसून त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असती तर आम्ही कारवाई केली असती परंतु सदर विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असल्याने आता पोलिसाच त्यावर कारवाई करतील असे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी सांगितले.