लॉस एंजेलिस – शाळेतील दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याच्या आरोपात वॉन्टेड असलेला एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळला आहे. कोलोरॅडो येथील डेन्वर येथे ही घटना घडली आहे. हा संशयित हल्लेखोर 17 वर्षीय युवक होता आणि त्याचे नाव ऑस्टिन लेयल असे होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
इस्ट हाय स्कूलमध्ये त्याने बेछुट गोळीबार करायला सुरुवात केली होती. त्या प्रकरणी त्याचा शोध घेतला जात होता. त्याच्या गोळीबारात जखमी झालेल्या शाळेच्या एका कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्मचाऱ्यावर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. शाळेमध्ये बेछुट गोळीबार होण्याची अमेरिकातील ही सर्वात अलिकडच्या काळातील घटना आहे.
लेयल दररोज शाळेत आल्यानंतर त्याची झडती घेतली जात असे. त्याच्या पूर्वीच्या वर्तनामुळे ही तपासणी दररोज केली जात होती, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा
लेयल हा पार्क कौंटीमध्ये त्याच्या कार जवळ मृतावस्थेत आढळला होता. दुपारी 4.30 वाजता त्याची कार या परिसरात बघितली गेली होती. त्याच्या 4 तासांनंतर काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. डेन्वर पोलीस आणि एफबीआयचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.