पुणे – राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
आधी प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांप्रमाणे एकूण 72 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरु होणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर व पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी 816 आधार संच उपलब्ध करून दिले आहेत.
कामकाजासाठी आधार ऑपरेटरची सेवा त्रयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध केली आहे. पूर्व तयारीबाबतच्या सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.