दिवाळीनिमित्त एस.टी.ची 10 टक्‍के भाडेवाढ

पुणे – दिवाळीच्या तोंडावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एसटी महामंडळाने गुरुवारी (दि.24) मध्यरात्रीपासून 10 टक्‍के भाडेवाढ लागू झाली आहे.

एस.टी.ची तिकीट दरवाढ 25 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान ही दरवाढ लागू असणार आहे. यामध्ये साधी बस, सेमी (एशियाड) आणि शिवशाही आसनी बससाठी 10 टक्‍के भाडेवाढ होणार, अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे. तर, शिवनेरी, शिवशाही स्लीपर व अश्‍वमेध या बससाठी भाढेवाढ करण्यात आली नाही.

यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे एस.टी. महामंडळ भाडेवाढ करणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, उत्पन्न वाढीसाठी दिवाळीच्या तोंडावर तिकिटात वाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.