नगर – जागेच्या वादातून मारहाण करून तिघांनी एकाच्या खिशातील रोकड हिसकावून घेतली. नवनागापूर येथील हॉटेल तलवार जवळ ही घटना घडली. रंजित वाघ, विक्रम बेरड व आणखी एकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेच्या वादातून विष्णू रासकर (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) यांना दुचाकीवर बसवून हॉटेल तलवार येथे आणले.
मारहाण करून खिशातील 6 हजार 700 रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विष्णू रासकर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गावडे हे करीत आहेत.