बावडा मार्गावर वैष्णवांची वाट बिकट

निमसाखर – बारामती-बावडा राज्य महामार्गावरून पंढरपूरसाठी संत सोपानकाका व संत संतराज महाराजांसह अन्य पालखी सोहळे मार्गस्थ झाले तर काही मार्गस्थ होण्याच्या तयारीत आहेत. लाखो वैष्णव मार्गस्थ होताना ऑप्टीकल्स फाईबर केबल टाकण्याचे काम साईडपट्टयांवर झाले आहे. खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजवले गेल्याने वारकऱ्यांना त्रास होणार असल्याने संबंधीत सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत संताप व्यक्‍त होत आहे.

काही वर्षांपूर्वी बीकेबीएन रस्ता नरसिंहपूर ते बावडा आणि बावडा ते कळंब, पुढे ठरावीक काही अंतर रस्त्याचे काम झाले आहे. रस्त्यासाठी पूर्वी माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर नव्याने नरसिंहपूर ते गणेशवाडीपर्यंत झालेल्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता केला आहे. मात्र, बावडा ते बारामतीसाठी पूर्वी रस्ता झाल्यानंतर काही वर्षांनी बीकेबीएन रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. यानंतरच्या काळामध्ये माजी सहकारमंत्री पाटील यांच्या प्रयत्नातून प्रमुख जिल्हा महामार्ग म्हणून रस्त्याची ओळख झाली. यामुळे त्याकाळी अल्पनिधीतून रस्त्याची देखभाल व्हायची. मात्र, दरम्यानच्या काळात जिल्हा प्रमुख मार्गावरून या रस्त्याची राज्य मार्ग म्हणून बढती मिळाली. तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.