ओडिशा– ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. सतत बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. असाच एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या महिलेला पेन्शन मिळण्यासाठी अनवाणी पायाने जावे लागत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी सरकारच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. यानंतर या व्हिडीओची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दखल घेतली आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये वृद्ध महिला तुटलेलल्या खुर्चीचा आधार घेत रस्त्यावर अनवानी बॅंकेत चालत जाताना दिसते. ओडिशाच्या नबरंगपूर येथील हा व्हिडिओ आहे. या ज्येष्ठ महिलेच नाव सूर्या हरिजन असे आहे. त्या 70 वर्षांच्या आहे. ओडिशाच्या झारीगाव SBI व्यवस्थापक झारीगाव शाखेत पेन्शन घेण्यासाठी त्यांना खडतर प्रवास करावा लागत आहे.
Can see the manager of the @TheOfficialSBI responding but yet wish @DFS_India and @TheOfficialSBI take cognisance of this and act humanely. Are they no bank Mitra? @FinMinIndia https://t.co/a9MdVizHim
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 20, 2023
याप्रकरणाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दखल घेत तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत दखल घ्यावी आणि मानवतेने वागावे असे आदेश दिले आहेत. यानंतर SBI अधिकाऱ्यांनी सीतारामन यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. यात त्यांनी सांगितले की, पुढील महिन्यापासून या महिलेच्या दारात पेन्शन पोहोचवली जाईल. यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासनही बँक व्यवस्थापकाने दिले आहे.