बारामती (प्रतिनिधी): कोरोना मुक्त होऊन आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचे बारामतीत फटाक्यांची आतषबाजी तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
गुरुवारी(दि २३) बारामती शहरातील एकाच कुटुंबातील चौघाजणांचा अहवाल निगेटीव्ह आला. अहवाल निगेटीव्ह आलेल्या कोरोना बाधित कुटुंबियांचे भागातील स्थानिक नगरसेविका, उपनगराध्यक्षा तरन्नुम अल्ताफ सय्यद यांनीजोरदार स्वागत केले.
फटाके वाजवत व फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर देखील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद स्वयंसेवक गणेश क, नितीन भागवत, ओंकार राऊत, योगेश गायकवाड, मेहबूब सय्यद इत्यादी उपस्थित होते.