जम्मू काश्‍मीरात मतदार संघाच्या फेररचनेचा जोरदार आग्रह

जम्मू: जम्मू काश्‍मीरातील मतदार संघांची लोकसंख्येच्या आधारावर फेररचना करण्याचा आग्रह जोर धरू लागला आहे. डोग्रा स्वाभीमान संघटनेने या मागणीचा जोरदार आग्रह धरतानाच जम्मू भागातील विधानसभा मतदार संघांची संख्या आठ ने वाढवावी अशी मागणी केली असून त्यातील सहा जागा पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरातून निर्वासित होऊन आलेल्या नागरीकांच्या प्रतिनिधींसाठी राखीव ठेवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संघटनेचे अध्यक्ष चौधरी लालसिंग यांनी म्हटले आहे की राज्यपालांच्या प्रशासकीय अध्यादेशातून ही मतदार संघ फेररचना सहज करता येण्याजोगी आहे कारण तसे या आधी करण्यात आले आहे. जम्मू काश्‍मीरातील मतदार संघांच्या फेररचनेच्या हालचालींचे आम्ही स्वागत करतो असेही त्यांनी म्हटले आहे. जम्मू विभागातील विधानसभेच्या फेररचनेत दोन जागा विस्थापित काश्‍मीरी पंडितांसाठी ठेवाव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.