शिवसेनेला जोरदार धक्का; 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांचे राजीनामे

नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. नाशिकमधील जागा भाजपला सूटल्याने शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणारे विलास शिंदे यांना पाठिंबा दिला.

शिवसेना-भाजप युतीमुळे नाशिक पश्चिम मतदार संघाची जागा शिवसेनेऐवजी भाजपाकडे गेली त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले विलास शिंदे यांनी बंडखोरी केली.

भाजप आणि शिवसेनेकडून युतीधर्म पाळला जावा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पक्षश्रेठींकडून बंडखोरांना समजावण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मात्र 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांनी आपले राजीनामे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)