मेक्सिको – मेक्सिको आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.४ इतकी नोंदली गेली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
An earthquake of magnitude 7.4 on the Richter scale hit Oaxaca, Mexico: US Geological Survey
— ANI (@ANI) June 23, 2020
माहितीनुसार, राजधानी मॅक्सिको शहर, दक्षिण मेक्सिको आणि सेंट्रल मेक्सिको येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या परिसरांमध्ये १४०पेक्षा अधिक भूकंपाचे झटके बसले. यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी घरांबाहेर धाव घेतली. या भूकंपाचा केंद्रबिंदू ओक्साका असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.
Earthquake in Mexico City- still occurring – not sure where epicenter is nor if there is any real damage pic.twitter.com/KDAou9YhPG
— 𝓐𝓷𝓭𝓪𝓵𝓪𝓵𝓾𝓬𝓱𝓪 (@Andalalucha) June 23, 2020