कीव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. तर या युद्धाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याच दरम्यान, रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. काल रशियाच्या सैन्याने मारियूपोलमध्ये असणाऱ्या स्टील प्लांटवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हे ठिकाण प्रतिकार करण्याचे शेवटचे ठिकाण मानले जाते, याविषयीची माहिती युक्रेनच्या सैनिकांनी दिली आहे.
युक्रेनियन नियंत्रणाखाली असलेल्या सुरक्षित शहरात पोहोचल्यानंतर लगेचच हा हल्ला सुरू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनसाठी UN मानवतावादी समन्वयक ओस्नाट लुबारानी यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी यावेळी,101 महिला, पुरुष, मुले आणि वृद्धांना बंकरमधून बाहेर काढण्यासाठी धन्यवाद, मात्र, तिथे राहिलेल्यांसाठी चांगली बातमी नाही. युक्रेनच्या सैनिकांनी म्हटले आहे की, रशियन सैन्याने प्लांटवर हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनच्या अझोव्ह रेजिमेंटचे डेप्युटी कमांडर श्वेतस्लाव पामर म्हणाले की, रशियन सैन्य चिलखती वाहने आणि टाक्यांच्या मदतीने जोरदार हल्ला करत आहेत.
युक्रेनचे उपपंतप्रधान इरियाना वेरेशचुक म्हणाले की, प्लांटमध्ये लपलेल्या युक्रेनियन सैनिकांची संख्या माहित नाही, परंतु रशियन अंदाजानुसार एका आठवड्यापूर्वी ही संख्या 2,000 होती आणि त्यापैकी 500 जखमी झाल्याचे वृत्त आहे. शेकडो नागरिकही तेथे आहेत. मेसेजिंग अॅप टेलिग्रामवर पामर म्हणाले, “आम्ही हल्ला हाणून पाडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू. मात्र अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही तातडीने पावले उचलण्याचे आवाहन करत आहोत.
ते म्हणाले की, रात्रभर प्लांटवर रशियन नौदल तोफखानाने गोळीबार केला आणि हवाई हल्ले केले. या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 10 नागरिक जखमी झाले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्लांटवर हल्ला न करण्याचे आदेश दिल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी हा हल्ला करण्यात आला आहे.