जुन्या भांडणाच्या वादातून एकाला मारहाण

सातारा- जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकास दगडाने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी युवराज सुरेश मुरारी (वय 17 रा. धोंडे कॉलनी, शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

युवराज मुरारी व ऋषिकेश हिरवे (रा. गोलमारुती मंदिर चौक), सिद्धार्थ पवार (रा. बोगदा) आणि आप्पा काळे यांच्यात जुना वाद होता.

त्या कारणावरून या तिघांनी गोल मारुती मंदिर चौकात युवराजला दगडाने मारहाण केली. यात युवराज जखमी झाला. शाहूपुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)