कडक सल्युट! कोरोनाविरोधातील लढ्यासाठी टाटा समूह करणार २००० कोटींचा खर्च

मुंबई – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आशा संकटसमयी सरकारी यंत्रणेसोबत सेलिब्रिटीज व खासजी क्षेत्रातील संस्था देखील या भयावह रोगाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. अशातच आज भारतातील नामांकित उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी २००० कोटींची मदत जाहीर केली आहे.

टाटा समूहाने आजवर देशासमोर उभे ठाकलेल्या अनेक संकटप्रसंगी सामाजिक भान राखत सढळ मदत केली असून कोरोना संकटाच्या विळख्यातून देशाची सुटका करण्यासाठी देखील टाटा समूह धावून आलाय. टाटा समूहाच्या या मदतीबाबत चेअरमन रत्न टाटा यांनी एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.

टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहे, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल २००० कोटी रुपये खर्च करणार आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात टाटा समूहाची जो नफा झाला त्याच रकमेतून दे २००० कोटी रुपये टाटा समूह गुंतवत असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर आता टाटा समूह लस उत्पादक कंपन्यांसोबतही करार करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.