कडक सॅल्यूट.! ‘फरहान अख्तर’चा कोरोना रूग्णांना मदतीचा हात

नवी दिल्ली – देशासह राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही तेवढ्याच वेगाने मोठी वाढ होत आहे. दरम्यान, हीच परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाउनचा कालावधी १५ मे पर्यंत वाढवला आहे. शिवाय, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास १ तारखेपासून सुरूवात झाली आहे. मात्र एवढे नियोजन करूनही राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ आणि मृत्यू काही कमी होताना दिसत नाही.

काही ठिकाणी तर ऑक्सिजन, औषधं आणि रुग्णालयात बेडसाठी नागरिकांना रांगा लागल्या आहेत. त्यात लसीकरण मोहीम सुद्धा मंदावली आहे. सध्या देश सर्वच बाजुंनी संकटात सापडला असता, भारताला इतर देशांकडून मदतीचा हात मिळत आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

सोनू सूद, गुरमीत चौधरी, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान असे अनेक कलाकार सध्या कोरोना काळात लोकांसाठी झटत आहेत. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता ‘फरहान अख्तर’चा देखील समावेश झाला आहे. फरहान ने सुद्धा लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. स्वतः हा फरहान अख्तरने सोशल मीडियावर ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

“माझी संस्था एक्सेल एंटरटेनमेंट कोरोना रूग्णांना आवश्यक सुविधा पुरवणार असल्याची घोषणा त्याने केली. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे काम करणार असल्याचे फरहानने सांगितले आहे.  अशा एनजीओंची यादी फरहानने सोशल मीडियावर शेअर केली़.” या आशयाचे ट्वीट फरहानने केले आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.