नेवासा – परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत असतांना मृत्यू झाल्याप्रकरणी संपुर्ण राज्यात मोठी खळबळ उडालेली असून मंगळवार (दि.१७) रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेवासा तालुकाध्यक्ष सुशिल धायजे,युवानेते शहराध्यक्ष पप्पु इंगळे यांनी नेवासा शहरासह नेवासा फाटा बंदची हाक दिली असता व्यापाऱ्यांनी स्वयंमस्फुर्तीने आपोपली दुकाणे बंद ठेवून आपला पाठींबा देत घटनेचा तीव्र निषेद्ध व्यक्त करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकासह इतर गुन्हेगारांवर देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करून भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा न्यायालयिन कोठडीत असतांना मृत्यू झालेला असून सुर्यवंशी याच्या मारेकऱ्यास तत्काळ अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशिल धायजे यांनी केली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) गटावतीने नेवासा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले या निवेदनात रिपाईच्यावतीने म्हटले आहे की,काही दिवसांपूर्वी परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबना घटनेचा निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण करण्यात आलेली होती या आंदोलनात नसलेल्या आणि कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी असलेल्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करुन मारहाण करणारे जे काही पोलीस जबाबदार असतील त्यांची तत्काळ नोकरीतून हकालपट्टी करावी तसेच भिमसैनिक सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकार कडून सांत्वनपर आर्थिक मदत देण्याची मागणी करुन या भीमसैनिकाला न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी रिपाईचे तालकाध्यक्ष सुशिल धायजे यांनी केली आहे यावेळी संजय सुखदान,रिपाईचे जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे,शांतवन खंडागळे नेवासा शहराध्यक्ष पप्पू इंगळे,तालुका कार्याध्यक्ष नितीन भालेराव,स्वनिल सोनकांबळे,सनिभाऊ पाटोळे यांच्यासह भिमसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेले होते.
भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा न्यायालयिन कोठडीत असतांना मृत्यु झालेला असला तरी पोलीसांनी त्याला आधीच बेदम अमानुष्य मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यु झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.