मोठी बातमी ! कर्नाटकात कोरोनाचा हाहा:कार; 10 ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा

बंगळुरू – कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटकात 10 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 24 मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

या लॉकडाऊनची अमलबजावणी अत्यंत कडकपणे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी वेळ ठरवून दिली आहे. त्यानुसार, सकाळी सहा ते दहा या वेळेत जनतेला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. या काळात सगळी हॉटेल बंद राहणार आहेत.

केवळ पार्सल सेवा उपलब्ध राहणार आहे. रस्त्याची कामे आणि बांधकाम उद्योग सुरू असणार आहेत. लॉकडाऊन कालावधीत दहानंतर रस्त्यावर कोणालाही येण्यास परवानगी नाही. केवळ वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली आहे. सगळी दुकाने आणि उद्योग बंद राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.