कोल्हापूर : कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉक डाऊन सुरू झाला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा आणि परवानगी दिलेल्या अस्थापना वगळता सर्व व्यवहार आज शंभर टक्के बंद होते. दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी 40 पेक्षा अधिक ठिकाणी बॅरेगेड लावून 355 वाहनांवर कारवाई करत कडक बंदोबस्त ठेवला आहे.
आजपासून पुढील 7 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडक लॉक डाउनला सुरुवात झाली आहे. दूध ,मेडिकल ,दवाखाने ,केअर सेंटर, बँका, एटीएम या अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवहार आणि व्यवसाय बंद होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून नियम मोडणार्या 355 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यातील वाहने 54 जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत तर उर्वरित 301 वाहनांवरती पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत 63 हजार 100 रुपयांचा दंड गुन्हा केला आहे दरम्यान आज दिवसभरात जिल्हा बाहेरून कोणत्याही वाहनाला प्रवेश देण्यात आलेला नाही. दरम्यान पोलिस दलातील दोन हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावरती तैनात करण्यात आले होते.
विशेष म्हणजे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी भेटी देऊन लॉक डाउन ची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या