पाचगणी (प्रतिनीधी) : सातारा जिल्हाअधिकारी यांनी पाचगणी व महाबळेश्वर येथे रात्री 10 नंतर बंद करण्याचे आदेश दिले होते . लाॅकडाऊन नंतर पर्यटकांचा ओघ नाताळ व नववर्षाच्या स्वागता करीता महाबळेश्वर व पाचगणी येथे वाढला आहे .
कोरोना पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन जिल्हाअधिकारी यांनी पाचगणी व महाबळेश्वरला रात्री 10 नंतर बंद करण्याच्या आदेशानंतर महाबळेश्वर व पाचगणी येथे पोलीसानकडुन जोरदार कडक अमलबजावणी सुरु केली जात आहे.
महाबळेश्वर पोलीसानकडुन मुख्य बाजारपेठ सह सर्व हाॅटेल बंद करण्याकरीता सुचना देत रात्रीची गस्त पोलीसांकडुन करण्यात आली आहे . तर पाचगणी पोलीसानकडुन दांडेघर यामुख्य नाक्यावर पोलिसांनी पथक ठेवत येणाऱ्या सर्व गाड्यांची चैाकशी करत गस्त केली जात आहे .
पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरींक्षक सतिश पवार यांनी पाचगणी व परीसरात फैाजफाट्यासह सगळी कडे कडेकोट बंदोबस्त नवीनवर्षाच्या पाश्वभुमीवर ठेवला आहे .