निर्बंधाची कडक अंमलबजावणी; लायसन्स, वाहनाचीही होणार जप्ती

 सहपोलीस आयुक्तांचे आदेश

पुणे – करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि जमावबंदीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही बेशिस्त विनाकारण भटंकती करत आहेत. त्यामुळे संबंधितांविरूद्ध दंडात्मक कारवाई करून लायसन्स आणि वाहनजप्ती करण्यात येणार आहे. शहरात आता निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सहपोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

निर्बंधाबाबत नागरिकांनी माहिती व्हावी, यासाठी पोलिसांकडून सहकार्य करण्यात आले. मात्र, आता कडक निर्बंधाची अंमलबजावणी सुरूवात झाली आहे. त्यानुसार विनाकारण भटकंती, अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली फिरणे, विनामास्क प्रवास, करोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली जाणार आहे. अत्यावश्‍यक सेवेत काम करणाऱ्यांनी पुरावा दाखवल्यानंतर सोडले जाणार आहे.

पोलिसांच्या मदतीला “एसपीओ’
शहरात पहिल्या लॉकडाउनपासून पोलिसांच्या मदतीला असलेल्या साध्या वेशातील विशेष पोलीस अधिकाऱ्यांची (एसपीओ) मदत पुन्हा घेतली जात आहे. नाकाबंदीदरम्यान एसपीओंद्वारे वाहन चालकांकडे चौकशी, अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना मदत, भटकंती करणाऱ्यांना सूचना, जनजागृतीवर भर देण्याचे काम केले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.