बांधकाम मजुरांचे कामगार कार्यालयात ठिय्या आंदोलन

पिंपरी  – गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काम करत असताना 25 हून अधिक बांधकाम कामगारांचा काम करताना मृत्यू झाला आहे. बांधकाम कामगार अजूनही योजना आणि सुविधांपासून वंचित आहे. बांधकाम मजुरांच्या मागण्या मांडण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने शिवाजीनगर, पुणे येथील कामगार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हे आंदोलन करण्यात आल्याने काम ठप्प पडले होते.

कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आपल्या प्रमुख मागण्यांसाठी संतप्त बांधकाम मजुरांनी पुणे शिवाजीनगर येथील कामगार कार्यलयाच्या गेटवर ठिय्या मांडत, कार्यालयाचे कामकाज बंद पाडून आपला संताप व्यक्‍त केला. सहाय्यक कामगार आयुक्‍त पनवेलकर यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. योगिता शिंदे, आशा कांबळे प्रीती रोडे, अनिसाबी खाटीक, अप्सर शेख, अंजुबाई राठोड, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)