देहूरोड – देहूरोड परिसरात दोन मुलींना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी प्रशासकीय रुग्णवाहिका या मुलींना घेऊन जाण्यासाठी आली. मात्र, संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी आमच्या मुली करोनाबाधित नाहीत, असे म्हणत त्यांना जाऊ देण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करून मुलींना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागले. परंतु यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शनिवारी (दि. 25) देहूरोड रात्री परिसरात ही घटना घडली.
देहूरोड परिसरात दोन मुलींना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी प्रशासकीय रुग्णवाहिका या मुलींना घेऊन जाण्यासाठी आली. मात्र, संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी आमच्या मुली करोनाबाधित नाहीत, असे म्हणत त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यास विरोध केला. त्यामुळे रुग्णवाहिकेबरोबर आलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच विनारुग्ण माघारी परतावे लागले.
याबाबत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे प्रशासन अधिकारी राजन सावंत म्हणाले की, देहूरोड परिसरात दोन मुलींना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र कुटुंबीयांनी मुली करोनाबाधित नाहीत, असे म्हणत त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यास विरोध केला. त्यामुळे रुग्णवाहिकेबरोबर आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना माघारी परतावे लागले.
रविवारी (दि. 26) दुपारी दोन्ही मुलींना पोलीस बंदोबस्तात घेऊन जात रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.