मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन
हिंगोली – जगात भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे निवडणुकीच्या माध्यमातून हात बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आखाडा बाळापूर येथील जाहीर सभेत केले.
हिंगोली लोकसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आखाडा बाळापूर येथे शुक्रवारी दि.12 एप्रिल रोजी सायंकाळी चार वसजताच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षावर सडकून टीका करीत मोदींनी राबविलेल्या कल्याणकारी योजनेवर प्रकाश टाकण्याचा अधिक भर दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाला नीती,धोरण हे काही नसून कॉंग्रेस हे काल्पनिक पात्र आहे. देशद्रोही कलम 124 अ रद्द करण्याचा डाव कॉंग्रेसने आणला होता. त्यावर मोदी सरकारने नकार दिला. यासाठी देशात भारत महासत्ता बनविण्यासाठी एका हातात संविधान व दुसऱ्या हातात तिरंगा घेणाऱ्या नरेंद्र मोदी साठी उमेदवार हेमंत पाटील लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना भरभरून मतदान करण्याचे आवाहन शेवटी जनतेला केले.
यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजी माने, आमदार तानाजी मुटकुळे, मा. आ. गजानन घुगे, हिंगोली नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवरणी नरवाडे, डी. के. दुर्गे. आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.