मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गणरायाकडे प्रार्थना
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे गणपती बाप्पा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गणरायाची मनोभावे पुजा करून सर्व संकटांवर मात करण्याची ताकद आम्हाला दे अशी प्रार्थना केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी आज गणपतीची पुजा करण्यात आली. त्यावेळी त्यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व गणेशभक्तांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra CM Devendra Fadnavis offers prayer at his residence in Mumbai along with his wife and daughter, on #GaneshChaturthi today. pic.twitter.com/dkiujO8qT7
— ANI (@ANI) September 2, 2019
जगभरात हे गणेशपर्व हे सर्वांसाठी आनंद देणारा पर्व असतो. मात्र महाराष्ट्रात या पर्वाचा उत्साह काही वेगळ्याच उंचीवरचा असतो. गणरायाने सर्वांना आशिर्वाद द्यावेत, तसेच राज्यावर येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याची ताकद आम्हाला गणरायाने द्यावी अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच सर्व गणेशभक्तांना या गणेशपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.