पुणे – गेल्या दोन दशकांपासून सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक उपक्रांमध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या पुण्यातील “झील एज्युकेशन सोसायटी” या संस्थेने गतवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पुन्हा एकदा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भारत देशाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तसेच भारताचा इतिहास सुद्धा प्रचंड गौरवशाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराजांचं स्वराज टिकवण्यासाठी आपले स्वतः चे बलिदान देऊन सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणणारे नरवीर तानाजी मालुसरे या तीन स्वराज्याच्या शीलेदारांची व भारत देशात सन्मानाने फडकवला जाणाऱ्या तिरांग्याची प्रतिकृती या वर्षी झील एज्युकेशन सोसायटीचे ४००० पेक्षा जास्त विद्यार्थी साकारणार आहेत.