डोर्लेवाडीत विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अजब शिक्षा

उठाबशा आणि कोंबडा करण्याची केली शिक्षा ; मास्क वापरण्याचे नागरिकांना केले आवाहन

डोर्लेवाडी ( प्रतिनिधी ) :  डोर्लेवाडी ( बारामती ) येथे शहर पोलिसांनी बारामती शहरासह हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावात देखील करोना च्या पार्श्वभूमीवर कडक उपायोजना राबवल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी डोर्लेवाडीत पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या अनेक जणांना उठाबशा आणि कोंबडा करत त्यांना शिक्षा दिली आहे. उद्यापासून विनामास्क, आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सापडल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

डोर्लेवाडीतील नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, डोर्लेवाडीचे पोलीस पाटील नवनाथ मदने, डोर्लेवाडीचे सरपंच बाळासाहेब सलवदे, उपसरपंच दादासो दळवी, ग्रामविकास अधिकारी सय्यद ए. जे.यांनी केले आहे.

बारामती शहरासह तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत याच पार्श्वभूमीवर 15 जुलैपासून प्रशासनाच्या वतीने बारामती शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. कामाच्या व्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर पडू नये. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. आवश्यकता असल्यास मास्क लावूनच बाहेर पडावे वारंवार साबणने हात स्वच्छ करावे, सोशल डिस्टंसिंग राखावे असे आवाहन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.