अजब-गजब ! अपत्यप्राप्तीसाठी जन्मठेप भोगणाऱ्या कैद्याला 15 दिवसांचा पॅरोल

पाटणा – गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कैद्याची कारागृहात रवानगी करण्यात येते. या कैद्यांना अनेकदा सुट्टी मिळत असते. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी तसेच आई-वडिलांच्या अंत्यविधीसाठी पॅरोल देण्यात येतो. मात्र बिहारमध्ये एका कैद्याला अजब-गजब कारणासाठी पॅरोल देण्यात आला आहे.

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला चक्क वंशवाढविण्यासाठी अर्थात पुत्रप्राप्तीसाठी 15 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आली आहे. कैद्याच्या पत्नीने त्यांचा वंश वाढावा यासाठी पतीला पंधरा दिवसांची सुट्टी मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. पाटणा न्यायालयाने तिची बाजू लक्षात घेत आरोपीला पंधरा दिवसांचा पॅरोल देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अशाप्रकारचा पॅरोल मिळण्याची बिहारमधील ही पहिलीच घटना आहे.

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील उत्तरनावा गावातील विक्की पटेल नावाचा गुन्हेगार एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी 2012 पासून कारगृहात शिक्षा भोगत आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. 2019 मध्ये या कैद्याची पत्नी रंजना पटेल हिने अपत्यप्राप्तीसाठी कैदेत असलेल्या पतीला पॅरोल मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

याचिकेत महिलेने म्हटलं होतं की, पतीला अजीवन कारावासाची शिक्षा झाल्यामुळे आयुष्यभर मुलं होणार नाही. तिला एकट्यानेच आयुष्य जगावं लागेल. त्यामुळे मला अपत्यप्राप्तीची आस आहे. त्यासाठी न्यायालयाने पतीला 15 दिवसांचा पॅरोल द्यावा. या सुनावणीत न्यायालयाने पत्नीची मागणी मान्य करत कैदी पतीला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.