तेहरान- इराणमध्ये जशास तसे या पद्धतीवर न्याय यंत्रणा कार्यरत असते म्हणजेच डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि प्राणांच्या बदल्यात प्राण या प्रकारे न्यायदान केले जाते ह्याच न्यायप्रणालीच्या आधारे एका मुलीने प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या आईला फाशीची शिक्षा देण्यास संमती दिली मरियम करीमी असे या महिलेचे नाव असून तिच्यावर आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप होता.
इराणमधील कायदा यंत्रणेप्रमाणे खून झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना न्यायदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला असतो या प्रमाणे न्यायालयाने मरियम करीमीच्या मुलीला मरियमला कोणती शिक्षा द्यायचे याबाबत विचारणा केली होती. न्यायालयाने आधीच तिला फाशीची शिक्षा सुनावली होती पण याबाबत काही बदल करायचा आहे का? याबाबत न्यायालयाने तिच्याकडे विचारणा केली असता मारियामच्या मुलीने आपल्या आईला माफ करण्यास नकार दिला.
फाशी माफ करण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर रक्कम देण्याचा आपल्या आईचा प्रस्तावही या मुलीने नाकारला आणि अखेर उत्तर इराणमधील सेंट्रल जेल मध्ये मरियमला फाशी देण्यात आली याबाबत समजलेल्या माहितीप्रमाणे प्रत्यक्षात मरियम करीमीने आपल्या पतीची हत्या केली नव्हती पण तीच्यावर तिचा पती दररोज अत्याचार करत असल्याने मरियमच्या वडिलांनीच ही हत्या घडवून आणली ही माहिती समोर येत आहे. मरियम च्या वडलांनी तलाक घेण्याचा प्रस्तावही जावयास समोर ठेवला होता.
पण तो प्रस्ताव नाकारण्यात आल्याने चिडून जाऊन तिच्या वडिलांनीच आपल्या जावयाची हत्या केली असे असले तरी पोलिसांनी मारियामवरच आपल्या पतीचा खून केल्याचा आणि कट केल्याचा आरोप ठेवला आणि तो सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली मरियमच्या वडिलांना कोणती शिक्षा ठोठावण्यात आली हे अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी मारियामला फाशी देत असताना ते कारागृहात उपस्थित होते.