नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाबाबत कॉंग्रेस नेत्या विद्या राणी यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्या कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी दारू दान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
हरियाणा कॉंग्रेसच्या नेत्या विद्या राणी यांनी म्हटले की, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना यावेळी पुढे यायला हवे आणि जे दान करून शकतात त्यांनी दान करावे. त्यात भाजीपाला, पैसे आणि दारू असे जे काही दान करता येईल ते दान करावे.
त्यांच्या या व्हिडिओवर एका ट्विटर यूजरने चांगलीच टीका करत म्हटले की, ‘शेतकरी आंदोलन करीत आहेत की, पार्टी करीत आहेत, ज्यात दारू दान करण्याची गरज आहे?’
या व्हिडिओत विद्या राणी यांनी म्हटले आहे की, ‘या वेळी आपण हरलो तर आपले अस्तित्व नष्ट होईल. हे आंदोलन 26 जानेवारी रोजी संपल्यात जमा झाले होते. मात्र शेतकऱ्यांचा आवाज बुलंद असल्यामुळे हे आंदोलन पुन्हा उभे राहिले. हे आंदोलन आता आपल्याला पुढे चालवावे लागणार आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना हरप्रकारे मदत केली पाहिजे. पैसे, भाजीपाला असो की, दारू असो दान करायला हवे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बळ द्यायला पाहिजे.’
या व्हिडिओवर टीका होत असल्यामुळे दारू याचा अर्थ शब्दशः घेऊ नये, ती बोलण्याची एक रित असल्याचे समर्थन केले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वप्रकारे मदत करावी असा त्याचा अर्थ घ्यावा असे स्पष्टीकरण समर्थकांकडून येत आहेत.