मुंबई – सध्या शेअर बाजारात तेजी असल्यामुळे अनेक कंपन्या आपले आयपीओ बाजारात उपलब्ध करीत आहेत. स्वयंपाक घरातील उपकरणांचे उत्पादन करणारी स्टोव्ह क्राफ्ट कंपनी 25 जानेवारीपासून आयपीओतील समभाग किरकोळ गुंतवणूकदारांना उपलब्ध करणार आहे.
या शेअरची किंमत 384 ते 385 ठरविण्यात आली आहे. 28 जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यासाठी नोंदणी करता येईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला 412 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. या आठवड्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, इंडिगो पेन्टस्, होम फर्स्ट फायनान्स कंपनीचे आयपीओ बाजारात आले आहेत.