मार्च 2016 मध्ये देशासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मोठ्या कारकिर्दीनंतर हरभजनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपणार हे निश्चित आहे. तसेच झाले सुद्धा पण भज्जीच्या निवृत्तीच्या वेळेमुळे त्याच्या पुढच्या डावाची अटकळ वाढली आहे.
Picture loaded with possibilities …. With Bhajji the shining star pic.twitter.com/5TWhPzFpNl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 15, 2021
हरभजन सिंगने अशा वेळी निवृत्तीची घोषणा केली आहे, जेव्हा पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. बरोबर 9 दिवसांपूर्वी त्याने पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली होती. एवढंच असतं तर या भेटीला एवढं बळ मिळालं नसतं. पण भेटीनंतर सिद्धूने ट्विटरवर फोटो शेअर करत जे काही लिहले यावरून हे स्पष्ट झाले आहे की हरभजन टीम इंडियाची जर्सी उतरवल्यानंतर लवकरच राजकीय पोशाख घालू शकतो.
हरभजनला भेटल्यानंतर सिद्धू यांनी ट्विटरवर लिहिले की, “शक्यतेने भरलेले चित्र… चमकणारा स्टार भज्जीसोबत. त्यादिवशी सिद्धूने जे संकेत दिले होते, त्या शक्यता लवकरच समोर येऊ शकतात. या बैठकीनंतर भज्जी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विरोधकांसमोर ‘दूसरा-गुगली’ फेकून सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकतात, हे जवळपास निश्चित झाले आहे.