प्रचंड लोकप्रियता… वेश्याव्यवसाय…हालाखी…शेवटी करूण अंत! वाचा ‘या’ अभिनेत्रीचा जीवनप्रवास…

काही लोकांचे आयुष्यच एखाद्या चित्रपटाप्रमाणे असते. चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळविल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीचे शोषण झाले..तिच्या इच्छेविरुद्ध तिला वेश्याव्यवसायात ढकलले गेले..त्यानंतर ‘एड्स’ सारख्या जीवघेण्या रोगाने ग्रस्त झाल्यावर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बेवारस अवस्थेत रस्त्यावर तिचा तडफडून मृत्यू झाला ! 

अक्षरशः सिनेमाच्या कथेसारखाच ‘या’ अभिनेत्रीचा जीवनप्रवास होता. तिचे नाव निशा नूर. 80 च्या दशकात निशा नूरचे नाणे दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात चालत असे. निशाने कमल हासन सारख्या अनेक स्टार्ससोबत काम केले. निशाची फिल्मी कारकीर्द उज्ज्वल होती पण तिचे खरे आयुष्य एका गडद अंधारापेक्षा कमी नव्हते. 

निशाचा जन्म 18 सप्टेंबर1962 साली तंबरम येथे झाला. जर निशा आज जिवंत असती तर तिचा 59 वा वाढदिवस साजरा केला असता. निशा नूर अर्थातच आज या जगात नाही, पण तिच्या जीवनाचे सत्य जाणून घेतल्यावर तुम्हाला गलबलून येईल. 2007 मध्ये निशा नूर एका दर्ग्याच्या बाहेर सापडली होती. त्या वेळी निशा नूरच्या अंगावर किडे आणि मुंग्या रेंगाळत होते. तिची काळजी घेणारे कोणी नव्हते.

चित्रपटाला यश मिळूनही निशाचे आयुष्य उजाड आणि वेदनादायक राहिले. जेव्हा निशा दर्ग्याच्या बाहेर सापडली तेव्हा प्रथम कोणीही तिला ओळखू शकले नाही. रुग्णालयात आणल्यावर, निशाला एड्स झाल्याचे आढळून आले. यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली आणि नंतर 2007 मध्ये निशा नूरने हे जग सोडले.

निशा नूरने 1981 मधील ‘टिक! टिक!’ या चित्रपटासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘टिक! टिक!’, ‘अय्यर द ग्रेट ‘, ‘कल्याण अगतिगल’ हे तिकीट खिडकीवर आश्चर्यकारक कामगिरी करणारे चित्रपट होते. निशाने फक्त चांगला अभिनयाचं केला नाही, तर तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. लोक तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असत. पण कोणास ठाऊक होते की जी एकेकाळी इतकी हिट अभिनेत्री होती, तिचा शेवट इतका वेदनादायक असेल.

निशा ग्लॅमरच्या जगात जास्त काळ राहिली नाही. जेव्हा रातोरात मिळालेली लोकप्रियता कमी होऊ लागली, तेव्हा तिला काम मिळणे बंद झाले. यामुळे तिने इंडस्ट्री सोडली. आर्थिक समस्यांमुळे निशा अचानक कुठेतरी गायब झाली. कोणीतरी तिला वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याची बातमी सुद्धा आली. असेही म्हटले जाते की येथून निशाला एड्स सारखा जीवघेणा आजार झाला. 

त्याच वेळी, काही लोकांचे असे म्हणणे होते की, फिल्म इंडस्ट्रीत तिचे खूप शोषण झाले. यानंतर जेव्हा ती जगासमोर आली तेव्हा कोणीही तिला ओळखले नाही. काही दिवस रुग्णालयात गेल्यानंतर अखेर 2007 मध्ये तिचा मृत्यू झाला. आजही चाहते निशाचे चित्रपट पाहून तिची आठवण काढतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.