अमेरिकेत वादळामुळे 2 लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत ; आतापर्यंत 10 ठार

वॉशिंग्टन – दक्षिण अमेरिकेत शक्तिशाली वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. टेक्‍सास व डलासमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर 80 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. उ.कॅरोलिना, मिशिगन, मिसिसिपी व मेरीलॅंडमधील 1.70 लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला असून, 2500 हून अधिक उड्‌डाणे रद्द केलीत. हवामान विभागानुसार या वादळामुळे न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व अटलांटातील 9 कोटी लोकांना फटका बसू शकतो.

शिकागो, ह्यूस्टन, टेक्‍सास, पिट्‌सबर्ग व ओहियोसह डझनभर मुख्य विमानतळांनी उड्‌डाणे संचालन बंद केली आहेत. मिसिसिपी प्रशासनाच्या माहितीनुसार मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीसह जवळच्या शाळांचे 25 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत अडकले आहेत. तर 100 पेक्षा जास्त बेपत्ता झाल्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.