करोनाच्या आणखी एका लसीची चाचणी थांबवली

वॉशिंग्टन- जगभरात करोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करणाऱ्या लस किंवा औषधांच्या शोधासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी पुढील अडीच महिन्यात करोना लस उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

मात्र, दरम्यानच्या काळात कोरोना लस आणि तिची सुरक्षितता यावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेत मागील 48 तासात दोन करोना औषधांच्या चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे संबंधित औषधांचा अंतिम चाचणी अहवाल येण्यासाठी उशीर होणार आहे.

आधी अमेरिकेची कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने करोना लसीची चाचणी बंद केली. आता अमेरिकेच्या एली लिली कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या संशोधन विभाग प्रमुख मथाई माममेन यांनी मंगळवारी सांगितलं की, चाचणी थांबवणे हा एक तात्पुरता निर्णय असल्याची माहिती गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे. हा निर्णय औषधांमुळेच घ्यावा लागला असेल असं नाही. अंतिम टप्प्यातील वैद्यकीय चाचणीत असं होणं सामान्य आहे. हजारो लोकांवर ही चाचणी करण्यात आली आहे. यामागे औषधांच्या साईड इफेक्‍टचा शोध घेणे असा आहे.

दरम्यान, स्क्रिप्स रिसर्च इंस्टीट्यूटचे संचालक, डॉक्‍टर आणि वैज्ञानिक एरिक टोपोल यांनी ट्‌विट करत सांगितलं, लिलीच्या करोना लसीच्या चाचण्या सुरक्षेच्या कारणांमुळे थांबवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही टप्प्यातील चाचणींमध्ये याचे दुष्परिणाम दिसलेले नाहीत. त्यामुळे लवकरच या चाचणी पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.