नवी दिल्ली – दिल्लीतील असंख्य रिक्षा चालकांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या रिक्षांवर आय लव्ह केजरीवाल असे लिहीले आहे त्यांच्यावर दिल्ली पोलिस आकसाने कारवाई करीत असून त्यांना दहा हजार रूपयांचा दंड ठोठावीत आहेत. भाजपच्या लोकांनी गरीब रिक्षाचालकांवर आकसापोटी सुरू केलेली ही कारवाई त्वरीत थांबवावी अशी सुचना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की गरीब रिक्षा चालकांना इतक्या मोठ्या दंडाची शिक्षा करणे अमानुषपणाचे आहे. त्यांनी त्यांच्या रिक्षावर आय लव्ह केजरीवाल असे लिहीण्याने त्यांनी काहीं फार मोठा गुन्हा केला आहे असे भाजपच्या लोकांनी वाटून घेऊ नये. गरीबांवर सूड उगवणे त्यांनी त्वरीत थांबवले पाहिजे.
दिल्लीत आम आदमी पक्षातर्फे आय लव्ह केजरीवाल ही प्रचार मोहीम चालवली जात आहे. त्या अंतर्गत असे लिहीलेले बॅनर्स किंवा फलक लोकांना वाटले जात आहेत. तेच फलक काहीं रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षांवर लावले आहेत.