‘चक्रीवादळपेक्षा कोरोनाचे वादळ ‘मोठे’ ते पहिले थांबवा

मुंबई – अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यावरून  मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी  कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले.

 

नेमकं काय म्हणाले  संजय राऊत

‘चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी या वेळी करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.