पुणे – राज्यात सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी धानोरी रस्त्यावर साचल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पाणी लक्ष्मीनगर सोसायटीत घुसल्याने रहिवाश्यांनी रस्ता रोको केला आहे. यावेळी स्कूलबस अडविल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, यावेळी एकही नगरसेवक हजर नव्हते.