मुंबई – ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणे मोबाइल किंवा इंटरनेटद्वारे हॅक होण्याच्या शक्यतेबद्दल असलेले सार्वत्रिक संशयाचे वातावरण लक्षात घेता, उद्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ तसेच जिथे ही उपकरणं ठेवली जातात अशा प्रत्येक स्ट्रॉन्ग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली जावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे.
निवडणुकीत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमांतून हॅकर्सकडून ही उपकरणे हॅक होण्याची शक्यता आहे.