नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, दिल्लीमध्ये घडलेल्या ऑक्सिजनच्या दुर्घटना ताज्या असतानाच आता असाच तांडव पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. कर्नाटकात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने चमराजनगर जिल्ह्यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये १९ करोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.
कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. मात्र, ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात १९ रुग्ण करोनाबाधित होते.
Karnataka | 24 patients, including COVID-19 patients, died at Chamarajanagar District Hospital due to oxygen shortage & others reasons in last 24 hours. We are waiting for the death audit report: District Incharge Minister Suresh Kumar
(Visuals from outside the hospital) pic.twitter.com/8wEOkEEBvm
— ANI (@ANI) May 3, 2021
चमराजनगर रुग्णालयात जे काही झालं ते दुर्दैवी आहे. या घटनेबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मी मैसूर, मंड्या आणि चमराजनगरला जात आहे. चमराजनगरमध्ये रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर रुग्णालयाला सामोऱ्या जाव्या लागत असलेल्या इतर समस्यांचीही माहिती घेऊ,” असं कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हटले आहे.