जळगाव – महाकुंभ मेळ्यासाठी सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर रविवारी संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखाेरांनी जळगावात दगडफेक केली.
यात एका बाेगीची काच फुटल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी रेल्वे पाेलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एक्स्प्रेसने सव्वापाचच्या सुमारास जळगाव स्थानक साेडल्यानंतर शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या पुढे टवाळखाेर मुलांनी रेल्वे बाेगीवर दगड भिरकावले. यात बी-6 बाेगीच्या खिडकीची काच फुटून बाेगीत काचेचे तुकडे उडाले.