पुण्यात अतिक्रमण पथकावर दगडफेक

पुणे – महापालिकेच्या चाळ विभाग कार्यालयातर्फे वाकडेवाडीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पथकास विरोध करीत नागरिकांनी दगडफेक केली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून दोन महिलांसह सहा जणांना अटक केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली.

संदीप तारू (34), सुहास लोंढे (27), अंकुश गायकवाड (33) आणि नामदेव लोंढे (55) आणि दोन महिला (सर्व रा. वाकडेवाडी) यांना अटक केली. याप्रकरणी राकेश विटकर (48, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादी हे पुणे महापालिकेच्या चाळ विभाग कार्यालयात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. सोमवारी पीएमसी कॉलनीजवळ संभाजीनगर येथील अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही सुरू होती. यावेळी आरोपींनी अतिक्रमण कारवाईस विरोध केला. तसेच मनपा अधिकारी आणि पोलिसांच्या अंगावर धावून जात दगडफेक केली. तसेच धक्‍काबुक्‍की केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.