खामगाव बाजार समितीत दगडफेक; शेतकऱ्यांसह पोलीस जखमी

बुलडाणा – खामगाव स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी, आज बाजार समितीत भुईमुगाचे भाव गडगडले. भुईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार बंद करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण चिघळले.

या प्रकारानंतर तुरळक दगडफेकही झाली. या दगडफेकीत दोन शेतकऱ्यांसह एक पोलिसही जखमी झाला आहे. परिस्थिती आटोक्‍याबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. दरम्यान, वाढत्या आवकीमुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडलेले पाहायला मिळाले. केवळ 3200 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.